LIVE UPDATES

सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 17, 2026 09:58 PM
views 51  views

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आज सायंकाळी ही घटना घडल्याचे समोर येत आहे. 

 सायंकाळी घराकडे जात असताना वाटेत अज्ञात हल्लेखोराने तिला अडवून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू करण्यात आला आहे.