LIVE UPDATES

‘दृश्यम २’ पहिल्याच आठवड्यात पोहोचला १०० कोटींजवळ, कमावला ‘इतका’ गल्ला

सुरुवातीपासूनच ‘दृश्यम २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 23, 2022 13:16 PM
views 665  views

ब्युरो न्यूज : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उयकंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता ‘दृश्यम २’ही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट १०० कोटी कमाईचा आकडा गाठणार असल्याचे दिसत आहे.


‘दृश्यम २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली. ‘दृश्यम २’ हा ‘ब्रह्मास्र’ नंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. तर पहिल्याच विकएण्डला ‘दृश्यम २’ने बॉक्स ऑफिसवर ६४.१७ कोटींचा गल्ला जमवला होता. तसंच या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच ‘दृश्यम २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा असल्याचं पाहायला मिळत आहे.


सोमवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने १० कोटींची कमाई केली होती. तर त्या पाठोपाठ आता मंगळवारी या चित्रपटाने 11 कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ८७.०१ कोटी झालेली आहे. त्यामुळे बुधवार किंवा गुरुवारपर्यंत हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करेल असं स्पष्ट दिसत आहे.


‘दृश्यम २’ चित्रपटात अजय देवगणसह तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही चित्रपटात झळकला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026