सिंधुदुर्ग : अखेर भाजपचे ठरलं. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आपली उमेदवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी भाजपचे नारायण राणे यांचे नाव थोड्याच वेळात घोषित होणार आहे. नारायण राणे यांच्या नावावर हिरवा कंदील दिल्यानंतर त्याच्या नावाची दोन तासांमध्ये घोषणा होणार आहे. त्यामुळे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा थेट मुकाबला कोकणवासी यांना पाहायला मिळणार आहे. ऐन धुळवडीत उबाठा सेना विरुद्ध भाजप अशी शाब्दिक धुळवड रंगणार आहे. काल नारायण राणे यांच्यावर विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी टीका केली होती. त्या टीकेला तिकीट मिळाल्यानंतर राणेंचे कार्यकर्ते आणी भाजपचे कार्यकर्ते कसे उत्तर देतात? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
ताजी बातमी
View all








