LIVE UPDATES

उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय : नितेश राणे

आदित्यला CM बनवायचे होते म्हणणाऱ्या ठाकरेंचा खोटेपणा उघड !
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 20, 2024 07:57 AM
views 971  views

कणकवली :  उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रा समोर आपण किती खोटारडा आहे याचा पुरावाच दिला.2019 ला देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवायचे ठरवले होते हेही ठाकरे यांनी सांगून टाकले. जयदेव ठाकरेला विचारा उद्धव किती खोटारडा आहे. बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी जो उद्धव खोटे बोलतो, ज्याला रक्ताची नाती सांभाळता आली नाहीत त्या उध्दववर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत नाही. ज्या आदित्य ठाकरे ला मुख्यमंत्री बनवायची भाषा करता, ज्याचे अजून लग्न झाले नाही, मुलाशी की मुलीशी लग्न लावायचे हे अजून ठरत नाही त्याला देवेंद्र जी मुख्यमंत्री बनवणार होते असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे च्या केमिकल चा लोचा झाला आहे. मानेचे औषध आता मेंदूत गेले असून उद्धव ठाकरे आता वेडा झाला असल्याची टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंनी केली. ते कणकवलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 जयदेव ठाकरे यांनी कोर्टात दिलेलं स्टेटमेंट जर इंडियन एक्सप्रेस मध्ये छापले तर जनतेला कळेल की उद्धव ठाकरे हा किती नीच आहे. प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूची तारीख वेळेवर जाहीर करत नाही त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही असेही नितेश राणे म्हणाले. लोकसभा निवडणुकी नंतर स्वतः संजय राऊत स्वतःच्या भावाला घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार आहे. तारीख आणि स्थळ ठरलेले आहे फक्त 4 जून रोजी निकाल लागल्या नंतर राऊत शिंदेंकडे असतील. पंतप्रधान मोदींना घाम फुटला असे संजय राऊत म्हणाले यावर टीका करताना उद्धव ठाकरे डायपर घालून फिरतो काय असा प्रतिसवाल नितेश राणे यांनी केला. दूरदर्शन मोदींचे मुखपत्र झाल्याच्या टिकेवर सामना हा आता काँग्रेसचे मुखपत्र झाल्याची प्रति टीका राणे यांनी केली. गळ्यात भगवा घातला म्हणजे कोणी हिंदू होत नाही आधी मनातील भावना हिंदुवादी ठेवा असा टोला नितेश यांनी लगावला.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026