LIVE UPDATES

अन्यथा कणकवली पोलीस स्थानकात मोर्चा काढणार : अ‍ॅड. सुदीप कांबळे

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2024 10:44 AM
views 1360  views

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय - लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिल्याने शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. चालक वेदांत शेलार याच्यावर 304 कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी केली आहे. कणकवली पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अ‍ॅड. कांबळे यांनी योग्य ती कार्यवाही न झाल्यास गुरुवार 25 एप्रिलला कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिले. अपघात प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026