LIVE UPDATES

वैभववाडीत मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली !

'विजय साळसकर अमर रहे'च्या घोषणा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 26, 2022 19:16 PM
views 559  views

वैभववाडी : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, नागरिक यांना एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. अर्जुन रावराणे विद्यालय,ग्रामपंचायत एडगाव व तहसील कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांनी मिळून शहीदांना मानवंदना दिली.


मुंबईवर सन २००८ साली याच दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात वैभववाडीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील अधिकारी विजय साळसकर शहीद झाले होते. त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना वीरमरण आले होते. या हल्ल्यात निष्पाप नागरिक मारले गेले होते. या सर्वांना आज वैभववाडीत श्रद्धांजली वाहण्यात आली. एडगाव येथील साळसकर यांच्या स्मारकात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी जि.प.बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे,नायब तहसीलदार श्रीमती कासकर,एडगाव सरपंच  रविना रविंद्र तांबे सदस्या. प्रज्ञा प्रमोद रावराणे , वैष्णवी विनोद रावराणे, स्मृती संतोष पवार, सायली सुनिल घाडी, ग्रामसेवक उमेश राठोड, सचिन रावराणे , अर्जुन रावराणे विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. शहीद साळसकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. अ.रा.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विजय साळसकर अमर रहे  अशा घोषणा दिल्या.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026