LIVE UPDATES

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा | अशी होणार मतमोजणी

Edited by: ब्युरो
Published on: May 29, 2024 06:19 AM
views 1513  views

रत्नागिरी :   46-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी 25 फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी 24 फेऱ्या, सावंतवाडी 22 फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात 20 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

   मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी 8 वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.      

       265 चिपळूण विधानसभा मतदार संघात 336 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 345 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 267 राजापूरमध्ये 341 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. 268 कणकवली विधानसभा मतदार संघात 332 मतदान केंद्र असल्याने 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघात 278 मतदान केंद्र असल्याने 20 फेऱ्यांमध्ये तर, 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 308 मतदान केंद्र असल्याने 22 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बंध

    मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026