LIVE UPDATES

आताची मोठी बातमी | शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा पाच पाच कोटी ! चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट !

एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 01, 2022 14:29 PM
views 673  views

औरंगाबाद : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. ते फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


चंद्रकांत खैरे हे मीडियाशी संवाद साधत होते. या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही आस्था नाही. शेतकऱ्यांबद्दल कनवाळा नाही. केवळ आमदार पकडून ठेवायचे. त्यांना खोके द्यायचे एवढंच सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवले आहे. गुवाहाटीला काही खोके दिले काही लोकांना. पाच पाच खोके दिले असं म्हणतात. अशा पद्धतीने तिकडे लक्ष आहे. याबाबाचं काही इकडे लक्ष नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.


शेतकऱ्यांकडे या सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. वीज बिल थकल्याने त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून आवाहन केलं आहे.


छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. शेतकरी राजा जगला तर प्रजा जगेल आणि प्रजा जगली तरच राजा जगेल, असं शिवाजी महाराज सांगायचे. प्रजा जगली तरच राजा जगेल असं ते म्हणायचे. इतकं मोठं मन राज्याचं होतं. एवढा मोठा विचार होता. असं असतानाही राज्यपाल महाराजांचा अवमान करतात. ही काळी टोपी महाराष्ट्राचं काळं करायला आली की काय? असा संतप्त सवाल त्यांनी केला.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026