LIVE UPDATES

मंत्रिपद गेलं खड्ड्यात, आम्ही त्यांना सोडणार नाही !

गुलाबराव पाटलांचा प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संताप
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 04, 2022 17:14 PM
views 945  views

जळगाव :  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, विरोधकच नाही तर सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून देखील भाजप आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, मंत्रिपद गेलं खड्ड्यात, असं प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवरायांच्याबाबतील कोणीही बोलण्याची गरज नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. ज्यांना शिवराय माहीत आहेत त्यांनीच बोलावं. शिवरायांबद्दल बोलताना आता आचारसंहिता करण्याची गरज आहे. कारण  सध्या कोणीही येतो आणि शिवरायांबद्दल बोलतो. मंत्रिपद गेलं खड्ड्यात त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026