LIVE UPDATES

ठाकरे VS शिंदे | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का | शिंदे गटाने जाहीर केली नवीकार्यकारणी

Edited by:
Published on: July 19, 2022 17:32 PM
views 10  views

मुंबई : 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट इथं शिंदे गटाच्या आमदारांची बैठकी सुरु आहे. या बैठकीत शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र शिंदे गटाने हात लावलेला नाही.

दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही वेळेपूर्वीच पक्ष विरोधी कारवाया केल्याने रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर लगेचच शिंदे गटाने या दोघांना नेतेपद दिलं आहे.

याशिवाय  उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026