LIVE UPDATES

‘अथांग’ वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 10, 2022 17:25 PM
views 594  views

मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयंत पवार दिग्दर्शित’अथांग’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मराठी वेबसीरिजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितली जाणारी ही पहिली वेबसीरिज ठरली आहे. या रहस्यमय वाड्यात अनेक गुपिते दडलेली असून एक एक करून ती समोर येत आहेत. आता ही वेबसीरिज एका अशा वळणावर आली आहे, जिथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या वेबसीरिजमधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘खुलते इथे कळी’ असे या सुमधूर गाण्याचे बोल असून हे गाणे शरयू दाते आणि रोहित राऊत यांनी गायले आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहित राऊत याचे संगीत लाभले आहे. या गाण्यात राऊ आणि सुशीलाचे हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे. बाईच्या नजरेला नजर न देणाऱ्या राऊच्या डोळ्यांतून आता प्रेम व्यक्त होताना दिसतेय, त्यामुळे आता वाड्यात काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहावी लागेल. ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल.

मागील भागात प्रेक्षकांनी पाहिले, राऊ आणि सुशीला यांच्यात प्रेमाची कळी फुलत असून दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत. याचे काय पडसाद उमटतील, पूर्वजांच्या पापाचे फळ राऊला भोगावे लागणार का, सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील भागांत दडलेली आहेत आणि हे जाणून घेण्यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘अथांग’ ही वेबसीरिज बघावी लागेल.

‘अथांग’ या वेबसीरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी – सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026