LIVE UPDATES

शाई फेकल्यानंतर चंद्रकांत पाटलांची तीव्र प्रतिक्रिया...

कार्यकर्त्याच्या घरातून निघताना फेकली होती शाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 10, 2022 19:41 PM
views 527  views

पुणे : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर हा शाई हल्ला झाला. या प्रकरणी हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.

या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी कार्यक्रम करणार आहे, मी चळवळीतला माणूस आहे, कुणालाही घाबरत नाही. तीन वेळा स्पष्टीकरण दिलं, दिलगिरी व्यक्त केली, हा भ्याडपणा आहे. हिंमत असेल तर समोरून या. महाराष्ट्रात ही झुंडशाही चालली आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र सहन करणार नाही. याचं सगळं यापुढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघतील', असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026