LIVE UPDATES

पुलाचे रोलिंग तोडून बस नदीत कोसळली | 13 जणांचा मृत्यू

Edited by:
Published on: July 19, 2022 17:34 PM
views 14  views

इंदूर :

मध्यप्रदेशातील इंदोरहून अमळनेर मार्गस्थ होत असलेली बस (एम.एच. -40 – 9848) थेट नर्मदा नदीत कोसळल्याची घटना सोमवारी सकळी घडली आहे. खळघाट येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे रोलिंग तोडून बस नदीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 15 ते 20 जण हे वाहून गेले आहेत. तर काहींना पोहत नदीचा किनारा गाठला आहे. महाराष्ट्र रोडवेजची ही बस असून ती इंदोरहून अमळनेर निघाली असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  बचावकार्यास सुरुवात केली आहे. शिवाय खरगोन येथील डीएम आणि पोलीस अधीक्षक यांनीही घटनास्थळी धाव घतेली आहे. नदीतून आतापर्यंत 13 मृतदेह हे बाहेर काढण्यात आले आहेत तर 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे.

अशी घडली दुर्घटना

या घटनेत बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रोलिंग ओलंडताना ही दुर्घटना घडली. एवढेच नाहीतर बस ही नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत उलटली. या विचित्र अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये बसचा चक्काचूर झाला असून जो तो नदी लगतचा खडकाळ भाग जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता. शिवाय पोलिसांनी बचाव कार्याला लागलीच सुरवात केली होती. त्यामुळे बचावकार्य संपल्यानंतरच सर्वकाही समोर येणार आहे.

बसमध्ये 55 प्रवासी

इंदोरहून अमळनेर निघालेल्या या बसमध्ये 55 प्रवासी होते. खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेवर 55 प्रवाशी बसमध्ये होते. नदीच्या खडकावर बस आदळून पुन्हा नदीत उलटल्याने अपघाताची तीव्रता वाढली. यामध्ये 15 ते 20 जण हे वाहून गेले आहेत. तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, 5 ते 7 जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु केले आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026