LIVE UPDATES

सिंधुदुर्ग एमआयडीसीमध्ये येणार फार्मा उद्योजक !

कोकणवासीयांना मिळणार रोजगार
Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2024 10:18 AM
views 1300  views

  • उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक

सावंतवाडी : सिंधुदुर्ग एमआयडीसीमध्ये  फार्मा उद्योजक येणार असून कोकणवासीयांना रोजगार मिळणार आहे. एमआयडीसी उभी करून गावकऱ्यांना रोजगाराची संधी मिळावी या मुख्य उद्देशाने तसेच कोकणाचा विकास व्हावा या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. प्रकल्पासाठी २९५ एकर जमीन राखून ठेवली असून एमआयडीसी अंतर्गत असेल हा प्रकल्प असणार आहे. आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणामध्ये इंडस्ट्री येत असताना पुर्वी काही लोक त्याला विरोध करत होते. पण आता ही मानसिकता बदलली आहे. दीपक केसरकर यांनी जो आता पुढाकार घेतला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मेडिकल डिवाइस तयार करण्यासाठी आपल्याला कोणतीही मदत लागणार असेल, तर ती आपण देऊ. फार्मामधील जेवढे लोक कोकणाकडे येतील त्यांचे आम्ही स्वागत नक्कीच करू असं मत व्यक्त केले.सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय सुंदर आहे. आपण जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र स्थापन केले असून आता फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदार हे देखील जोडले गेले आहेत. असे मत उद्योगमंत्री  उदय सामंत यांनी व्यक्त केले व उद्योजकांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबध्द आहे असे आश्वासन दिले. ‌

सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या आणि सागरी समुद्राने संपन्न असा आहे. आरोग्यदायी वातावरण, शून्य प्रदूषण आणि सहकार्य करणारी लोक आहेत. तसेच गोवा राज्य जवळ असणे हे औद्योगिक उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या कोकणातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याचे शहरातले व इतर राज्यातील स्थलांतर कमी होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्ह्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक दृष्ट्या संपन्न अशी जागा आहे. त्या ठिकाणची जागा ही उंच व सखल स्वरूपात आहे. ती जागा सरळ करून देण्याचे काम एमआयडीसीचे आहे. उद्योजकांना सगळ्या सुखसोयी एमआयडीसीकडून पुरविल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली. याप्रसंगी एमआयडीसीचे अधिकारी, मोठमोठ्या फार्मा कंपनीच्या मालक व उद्योजक आदींची उपस्थिती होती. सिंधुदुर्ग एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी अॅड. सुशीबेन शाह यांनी फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना या ठिकाणी एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026