LIVE UPDATES

'बेस्ट क्लास इन रुरल रिजन'ने अमेय गोडबोले सन्मानित

Edited by: मनोज पवार
Published on: November 30, 2024 13:48 PM
views 507  views

चिपळूण :  शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येथील गोडबोले क्लासेसचे संस्थापक, संचालक अमेय गोडबोले यांना स्टार अॅवार्डस् २०२४ अॅण्ड एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत 'बेस्ट क्लास इन रुरल रिजन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळणार गोडबोले क्लासेस हा कोकणातील पहिलाच क्लास ठरला आहे.

अमेय गोडबोले हे गोडबोले क्लासेसच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. ते क्लास व्यतिरिक्त सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, पालक व इतर नागरिकांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर मान्यवरांची व्याखाने, प्रशिक्षणे आयोजित करतात. त्यांच्या क्लासमध्ये सातवी ते बारावी माध्यमिक बोर्ड, सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यमातील मुलांना विशेष मार्गदर्शन केले जाते.

त्यांच्या क्लासने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे गोडबोले, हे इतर संस्थांमध्येही अध्यापन करतात. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कामामुळे यापूर्वी त्यांना 'ग्यानभूषण' व 'आयडॉल ऑफ महाराष्ट्र गुरुवंदना पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, पुणे येथील बेलगावे फाउंडेशन सांगली आणि ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे भारतीय समाजरत्न, सोशल एज्यूकेटर ऑफ द इअर हा राष्ट्रीय पुरस्कार, खेड येथील रिजनल टीचर ऑर्गनायझेशनतर्फे महाराष्ट्र आयडियल टीचर ऑफ द इअर हे राज्यस्तर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आता गोडबोले यांना 'बेस्ट क्लास इन रुरल रिजन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे बीकेएस एमएमआरडीए मैदानात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026