LIVE UPDATES

सत्तासंघर्ष | तब्बल 7,500 ग्रामपंचायतींसाठी राज्यात मतदान सुरू !

ग्रामपंचायती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी लावलाय जोर
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 18, 2022 08:38 AM
views 597  views

मुंबई : राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झालंय. या निवडणुका पक्षातीत होत असल्या तरी आपापल्या प्रभाव क्षेत्रातील ग्रामपंचायती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी जोर लावला आहे. मतमोजणी मंगळवार, २० डिसेंबर रोजी होईल. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत आहेत.


मतदानाची तयारी पूर्ण झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मतदानाची वेळ सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत आहे. त्यासाठी खासगी आस्थापनांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सरपंचपदासाठी थेट निवडणूक होईल. राज्य निवडणूक आयोगाने ७७५१ ग्रामपंचायतींसाठी अधिसूचना जारी केली होती. परंतु काही ग्रामपंचायती या बिनविरोध तर काहींना स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांतील गावांमध्ये मतदान होणार आहे.

नंदुरबारमधल्या 08 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची वेळ ही फक्त दुपारी 3.30 वाजेपर्यंत असणार

अक्कलकुवा तालुक्यातीसल 04 आणि अक्राणी तालुक्यात 04 ग्रामपंचायतींचा यात समावेश

या 08 ही ग्रामपंचायती अतिदुर्गम भागात वसलेल्या असल्याने याठिकाणी पोहचण्यासाठी मतदान यंत्रणेला अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

त्यामुळे परतताना रात्रीच्या अंधारात काही अघटीत घडू नये म्हणून या ग्रामपंचायतींच्या मतदानाची वेळ फक्त साडेतीन वाजेपर्यत असणार आहे

अक्कलकुवा तालुक्यातील मणीबेली, डनेल, जांगठी, धनखेडी तर अक्राणी तालुक्यातील उडद्या, भादरी, भादल, भमाणे अशा ग्रामपंचायती आहेत.

विविध जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

अहमदनगर : अकोले ११, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २६, नगर २७, नेवासा, १३, पारनेर १६, पाथर्डी ११, राहाता १२, संगमनेगर ३७, शेवगाव १२, श्रीरामपूर ६, राहुरी ११, श्रीगोंदा १०

अकोला : अकोला ५४, अकोट ३७, बाळापूर २६, बार्शी टाकळी ४७, मुर्तिझापूर ५१, पातूर २८, तेल्हारा २३

अमरावती: अचलपूर २३, अमरावती १२, अंजनगाव सुर्जी १३, भातकुली ११, चांदुर बाझार २७, चांदूर रेल्वे स्टेशन १७, चिखलदरा २६, दर्यापूर २५, धामणगाव रेल्वे स्टेशन ७, धारणी २३, मोर्शी २४, नांदगाव खा. १७, तिवसा १२, वरुड २३,

औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५,

बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारुर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरुर कासार २४, वाडवणी २५

भंडारा : भंडारा ३९, लाखांदूर ५१, लाखाणी ५१, मोहाडी ५८, पाओनी ४६, साकोली ४१, तुमसर ७७,

बुलढाणा : बुलढाणा १२, चिखली २८, देऊळगाव राजा १९, जळगाव जामोद १९, खामगाव १६, लोणार ३९, मलकापूर ११, मेहेकर ५०, मोताळा ११, नांदुरा १३, संग्रामपूर २१, शेगाव १०, सिंदखेड राजा ३०

चंद्रपूर : बल्लारपूर ५, भद्रावती ७,ब्रह्मपुरी १, चंद्रपूर ५, चिमूर ४, जिवती ३, कोरपणा १०, मुळ ७, नागभिड ५, पोंभुर्णा २, राजुरा ४, साओली ३, सिंदेवाही २, वरोरा १,

धुळे: धुळे ३३, शिरपूर १७, शिंदखेडा २३ ,साक्री ५५,

गडचिरोली : अहेरी ३, अरमोरी २, चामोर्शी ४ ,देसाईगंज १, धानोरा ४, एटापल्ली १, कोर्ची १, गडचिरोली २, कुरखेडा २, सिरोंचा ७

गोंदिया : आमगाव ३४, अर्जुनी मोरगाव ४०, देवरी २५, गोंदिया ७१, गोरेगाव ३०, सडक अर्जुनी ४३, सालेकसा ३१,

हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०

जळगाव : अमळनेर २४, भडगाव ६, भुसावळ६, बोदवड ५, चाळीसगाव १६, चोपडा ५, धरणगाव ७, एरंडोल ६, जळगाव १२, जामनेर १२, मुक्ताईनगर २, पारोळा ९, रावेर २२, यावल ८

जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाफ्राबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५

कोल्हापूर: आजरा ३६, भुदरगड ४४, चांदगड ४०, गडहिंग्लज ३४, गगनबावडा २१, हातकणंगले ३९, कागल २६, करवीर ५३, पन्हाळा ५०, राधानगरी ६६, शाहुवाडी ४९, शिरोळ १७

लातूर: अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरुर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३

नागपूर: भिवपूर १०, कळमेश्वर २३, कम्पटे २७, काटोल २७, कुही ४, मोऊदा २४, नागपूर ग्रामीण १९, नरखेड २२, पारशिवणी २२, रामटेक ८, सावणेर ३६, उमरेड ७, हिंगणा ७, मौऊदा

नंदुरबार :अक्कलकुवा ३१, अक्राणी ४७, नंदुरबार १८, नवापूर १६, शहादा १०, तळोदा १

उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४

पालघर : पालघर ३२, तलासरी १, वसई १५, वाडा १५,

परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३,

पुणे : आंबेगाव २१, बारामती १३, भोर ५४, दौंड ८, हवेली ७, इंदापूर २६, जुन्नर २, खेड २३, मावळ ९, मुळशी ११, शिरुर ४, वेल्हा २८,

रायगड: महाड ७३,श्रीवर्धन १३, अलिबाग ६, उरण १८, कर्जत ७, खालापूर १४, तळा १, पनवेल १०, पेण २६, पोलादपूर १६, माणगाव १९, मुरुड ५, म्हसळा १३, रोहा ५, सुधागड १४

रत्नागिरी: चिपळूण ३२, दापोली ३०, गुहागर २१, लांजा १९, मंडणगड १४, रत्नागिरी २९, संगमेश्वर ३६, खेड १०, राजापूर ३१

सांगली : आटपाडी २६, जत ८१, कडेगाव ४३, कवठे महाकाळ २९, खानापूर ४५, मिरज ३८, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६, वाळवा ८८

सातारा : जावली १५, कराड ४४, खंडाळा २, खटाव १५, कोरेगाव ५१, महाबळेश्वरर ६, माण ३०, पाटण ८६, फलटण २४, सातारा ३९, वाई ७

सिंधुदुर्ग: देवगड ३८, दोडामार्ग २८, कणकवली ५८, कुडाळ ५४, मालवण ५५, सावंतवाडी ५२, वैभववाडी १७, वेगुर्ला २३

सोलापूर : अक्कलकोट २०, बार्शी २२, करमाळा ३०, माढा ८, माळशिरस ३५, मंगळवेढा १८, मोहोळ १०, उत्तर सोलापूर १२, पंढरपूर ११,सांगोला ६, दक्षिण सोलापूर १७

इंग्लंडचा संघ सूर्यकुमारला घाबरला; सेमीफायनलमध्ये रोखण्यासाठी सहा जणांचा खास प्लान

ठाणे : भिवंडी १४, कल्याण ९, मुरबाड १४, शहापूर ५

वर्धा : आर्वी २६, आष्टी ६, देवळी १२, हिंगणघाट १२, कारंजा १७, समुद्रपूर ७, सेलू २३, वर्धा १०

वाशिम :कारंजा ५७,मालेगाव ४८, मंगरुळपिर ४४, मानोरा ४१, रिसोड ४५, वाशिम :५२

यवतमाळ : अर्णी ७, बाभुळगाव १, दारव्हा ८, दिग्रस ५, घाटंजी ६, मारेगाव९, नेर १, पुसद १२, राळेगाव , उमररखेड ४, वाणी १९, यवतमाळ १६, झारजिमणी ४

नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १

नाशिक : इगतपुरी २, कळवण १६, चांदवड ३५, त्र्यंबकेश्वर १, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, येवला ७, सिन्नर १२


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026