LIVE UPDATES

उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट

Edited by: ब्युरो
Published on: December 17, 2024 15:57 PM
views 485  views

नागपूर : नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज हजेरी लावली. पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते थेट CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. 7 मिनिट या दोघांची भेट झाली. मात्र यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात. 

नागपूरमध्ये येताच सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026