LIVE UPDATES

रायगड - नाशिकच्या पालकमंत्रीपदाला का दिली स्थगिती ?

Edited by: ब्युरो
Published on: January 20, 2025 10:32 AM
views 649  views

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या पालकमंत्रिपदाची घोषणा होताच काही नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. यात रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

परंतु शिंदे गटाच्या पारड्यात रायगडचे पालकमंत्रिपद जाईल असे गोगावले समर्थकांना वाटत होते. मात्र, गोगावले यांना डावलून पुन्हा अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात आले. या निर्णयावर आक्रमक होऊन गोगावले समर्थकांनी टायर जाळून निषेध केला. रविवारी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता इच्छुक मंत्र्यांची वर्णी लागेल का आणि यावर सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026