LIVE UPDATES

धक्कादायक बातमी | 'केके'च्या चेहऱ्यावर, डोक्याजवळ जखमांचे निशाण | अनैसर्गिक मृत्यूची नोंद !

Edited by:
Published on: July 19, 2022 17:40 PM
views 0  views

कोलकाता : प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. या प्रकरणामध्ये आता कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने चर्चांना तोंड फुटलं आहे. न्यू मार्केट पोलीस स्थानकामध्ये केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची नोंद पोलिसांनी केलीय. आज केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने या प्रकरणासंदर्भातील तपास होण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

३१ मे रोजी केके कॉन्सर्टवरुन परत आल्यानंतर ग्रॅण्ड हॉटेल येथे कोसळला. हे हॉटेल मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. केकेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. तो ५४ वर्षांचा होता. केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला आणि त्याला ततडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.  त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या सुत्रांनी केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्याजवळ जखमांचे निशाण दिसून आले आहेत. आज कोलकात्यामधील सएसएकेएम रुग्णालयामध्ये केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. पोलीस ग्रॅण्ड हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणार आहेत. तसेच ते या हॉटेलमधील कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही चौकशी करणार आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026