LIVE UPDATES

राज्यात अवकाळीची शक्यता

Edited by:
Published on: April 01, 2025 10:56 AM
views 757  views

मुंबई : बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे, ढगांच्या गडगटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांत गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात ४० ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वादळी वारे वाहून ढगांच्या गडगटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा आणि गारपिटीचा जोर जास्त राहील.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026