LIVE UPDATES

हीच योग्य वेळ कांदा खरेदी करण्याची

Edited by:
Published on: April 30, 2025 15:36 PM
views 2812  views

बेळगाव | लुईस रॉड्रिग्ज :   महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर कांदा पीकवणाऱ्या क्षेत्रांमधून वाढत्या पुरवठ्यामुळे बेळगावच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरत आहेत. कांद्याच्या गुणवत्तेनुसार आणि आकारानुसार घाऊक दर ५ ते १८ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारातील घाऊक विक्रेत्यांच्या मते, दर आठवड्याला कांदा घेऊन जाणाऱ्या मल्टी एक्सल ट्रक बाजारात येत आहेत. ज्यामुळे पुरेसा कांद्य़ाचा बेळगाव मर्केट मध्य़े भरपूर पुरवठा होत आहे. परिणामी गोव्याला सुद्धा पुरवठा वाढला आहे ज्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात आहेत. 

व्यापाऱ्यांच्या मते, घाऊक दरात कांदे खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे कारण दर स्थिर आहेत आणि कांद्याची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. "नाशिक, लासलगाव , सोलापूर आणि उत्तर कर्नाटक प्रदेशातून पुरवठा वाढल्याने गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर स्थिर आहेत. शिवाय, येथील एपीएमसी घाऊक कांदा आणि बटाटा बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा येत आहे, ज्यामुळे आता पावसाळ्यासाठी 'पुरुमेंत' म्हणून कांदा खरेदी करता येतो.

"दर आठवड्याला एपीएमसी घाऊक बाजारात सुमारे २०० मल्टी एक्सल ट्रक कांदे येत आहेत ज्यामुळे दर कमी झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे, शेतकरी देखील त्यांचा साठा कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण उच्च तापमानामुळे कांदा सडतो. "हा ट्रेंड आणखी महिनाभर चालू राहण्याची अपेक्षा आहे," असे ज्योती ट्रेडर्सचे मालक व प्रमुख घाऊक विक्रेते संभाजीराव होनगेकर म्हणाले.

घाऊक दरांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की आकारानुसार दर ५ ते १७ रुपये प्रति किलो दरम्यान स्थीर आहेत . उदाहरणार्थ, सर्वात लहान आकार जो 'गोळी' म्हणून ओळखला जातो तो ५ ते ८ रुपये प्रति किलो दरम्यान उपलब्ध असतो तर सर्वात मोठा आणि सर्वोत्तम दर्जाचा १५ ते १८ रुपये प्रति किलो पर्यंत उपलब्ध असतो. "या वर्षी उपलब्ध असलेल्या सर्वात कमी दराच्या कांद्यांपैकी हा एक असू शकतो," होनगेकर पुढे म्हणाले.

आणखी एक होलसेल व्यापरी संदीप मुंगारी म्हणाले की, पावसाळ्यासाठी कांदा खरेदी करण्यासाठी अनेक कुटुंबे घाऊक बाजारात येत आहेत. "कांदा खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे व पावसाळ्य़ासाठी अथवा पुढील वर्षासाठी ग्राहकांनी एपीएमसी मार्केट मध्ये येवुन होलसेल दरात कांदा खरेदी करावी." असे मुंगरी यांनी सुचवले.

रिटेलर्स व्यतिरिक्त, बेळगाव एपीएमसी घाऊक कांदा बाजारात मोठ्या संख्येने किरकोळ विक्रेते भेट देत आहेत. कारण दररोज या कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा येत असल्याने स्वयंपाकघरातील बजेट नियंत्रणात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026