LIVE UPDATES

BREAKING NEWS | केंद्रीय मंत्री नारायण राणे - राज ठाकरेंची भेट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 31, 2022 18:10 PM
views 753  views

मुंबई : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. नारायण राणे थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे सुद्धा उपस्थित होत्या. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. आजच्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात.  


मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. भाजपाने आपलं सर्व लक्ष आता मुंबई महापालिकेवर केंद्रीत केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. सोबतच मनसे देखील युतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.  त्यामुळे आज नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.




ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026