LIVE UPDATES

सरस्वती लक्ष्मण पवार दुसऱ्या वर्षीचा साहित्य पुरस्कार डॉ रुपेश पाटकर यांच्या 'अर्ज मधले दिवस' ला जाहीर

'अर्ज मधील दिवस' हे शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण : शुभांगी पवार
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 02, 2023 11:01 AM
views 511  views

कणकवली : सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा दुसरा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार - 2022  " डॉ रुपेश पाटकर  यांच्या "अर्ज मधले दिवस" ला जाहीर करत आहोत. डॉ रुपेश पाटकर हे गोवा व बांदा जि. सिंधुदुर्ग येथील मनोविकार तज्ञ आहेत. अरुण पांडे व भीमव्वा चलवादी हे सामाजिक कार्यकर्ते या पुस्तकामागील प्रेरणा आहेत. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान, कणकवली,च्या शुभांगी पवार यांनी ही माहिती दिली. 

 

   'अर्ज मधील दिवस' हे शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच तिरस्करणीय,  दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब व त्यांच्या पुनर्वसनाचे 'अर्ज' या सामाजिक संस्थेने केलेले प्रयत्न यांचा ज्यात उल्लेख आहे अशा अर्ज मधील दिवस ला हा पुरस्कार जाहीर करून  शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा उद्देश आहे.


रोख रक्कम रुपये 10000 आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दि. 1 मार्च 2023 यादिवशी सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी  प्रदान करण्यात येणार आहे.

      


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026