LIVE UPDATES

विस्मरणात गेलेल्या नात्यांचा परतीचा प्रवास

पारिजात ; कोकणच्या लाल मातीतील चित्रपट
Edited by: जुईली पांगम
Published on: May 28, 2025 13:25 PM
views 522  views

ब्युरो न्यूज : विस्मरणात गेलेल्या नात्यांचा परतीचा प्रवास दाखवणारा नवा कोरा चित्रपट 'पारिजात'. 25 मे रोजी 'व्हिस्परींग रेनड्रोप फिल्म्स' या युट्युब चॅनेलवर हा चित्रपट प्रदर्शित  झालाय.  प्रदर्शित  होताच अवघ्या  काही तासातच 20 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. कोकणच्या लाल मातीतील, कोकणातील माणसांनी बनवलेला, कोकणातील कलाकारांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट दीड तास तुम्हाला खिळवून ठेवणारा आहे.


आशय शांताराम आणि हृषिकेश पीके लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'पारिजात' हा चित्रपट.  कोकणातील संगमेश्वरमधील बुरंबी या निसर्गरम्य गावात याचे चित्रीकरण झालंय. कथा आहे कोकणच्या लाल मातीतील. माधव नावाच्या तरुणाभोवती फिरणारी. आई वारल्यानंतर माधव त्याच्या गावी येतो. तेव्हा त्याला गावापासून, लोकांपासून आणि त्याच्या बालपणीच्या आठवणींपासून हरवल्यासारखे वाटते. गावी त्याचं मन लागत नसतं. तर दुसरीकडे त्याच गावात राहणारे काका बावकर. गावातील अत्यंत प्रेमळ लोकांच्या वेढ्यात जगत असतात. तरीही ते त्यांचे प्रेम पाहू शकत नाही आणि नेहमीच त्यांच्या दूरच्या मुलाची स्तुती करत राहतात. यात माधव आणि काका बावकर वेगवेगळे असले तरी या दोघांच्याही भावनांचा नात्यांबाबतचा गुंता झालेला असतो. विस्मरणात गेलेली त्यांची ही नाती पुन्हा जशीच्या तशी माधव आणि काकांना सापडतील का ? हाच परतीचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

माधव आणि काका बावकर यांच्यावर आधारित ही कथा असली तरी इतरही पात्र महत्वाची ठरतात. हळूहळू हा चित्रपट या पात्रांच्या मदतीने पुढे सरकतो. त्या पात्रांचीही स्वतःची एक वेगळी कथा तुम्हाला चित्रपट सरतेशेवटी गुंतवून ठेवते. गावातच केलेलं संपूर्ण चित्रण, गावातील कौलारू घर, शेणाने सारवलेलं अंगण, तिथला निसर्ग हे सारं पाहताना मनाला शांतता देतो. त्यात 'दाटून केधवा' आणि 'का सुखाची' ही गाणी तर अप्रितम केली आहेत.  

सिंधुदुर्गातील सचिन कोंडस्कर हे माधवच्या प्रमुख भूमिकेत आहेत. अनिल दांडेकर, असित रेडीज, मानसी पाथरे, प्रभाकर डाऊल यांच्याही प्रमुख भूमिका आहे. कथा - संवाद  आशय शांताराम, पटकथा आशय शांताराम, हृषिकेश लांजेकर, छायाचित्रण - शुभम वाडकर, निर्मिती प्रमुख - स्वप्नील जाधव, संकलन - आशय शांताराम, संगीत - प्रशांत कांबळे, ओमकार गोखले, गीत - अमृता नरसाळे यांची आहे. मनाचा ठाव घेणारा,  नात्यांचा गुंता सोडवणारा 'पारिजात' 'व्हिस्परींग रेनड्रोप फिल्म्स' या युट्युब चॅनेलवर पाहता येईल. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026