LIVE UPDATES

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत : बैशाली काकडे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 09, 2025 20:06 PM
views 606  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दरवर्षी निस्वार्थी कृती व अतुलनिय शौर्य गाजविलेल्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. या अनुषंगाने क्रीडा, खेळ, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि नाविन्यपूर्ण काम या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलाने कोणतेही बालक, भारतीय नागरिक असून ज्याचे वास्तव्य भारतात आहे व ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त नाही, तसेच उच्चकोटीची असामान्य क्षमता व कौशल्य मिळवलेल्या बालकांकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बैशाली काकडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार खालील दोन प्रकारात देण्यात येतो. बाल शौर्य पुरस्कार : नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित संकटात, स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्राणाची बाजी लावून अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या किंवा प्रसंगावधान राखून तात्काळ प्रतिसाद देऊन स्वतःला किंवा समाजातील कुणालाही वाचविणाऱ्या शुरु बालकाला प्रधानमंत्री राष्ट्रीय "बाल शोर्य पुरस्कार" दिला जातो.

बाल नैपुण्य पुरस्कारः- प्रधानमंत्री राष्ट्रीय "बाल नैपुण्य पुरस्कार' पुढील 06 प्रकारात असामान्य यश व उच्चकोटीची असामान्य क्षमता व कौशल्ये मिळवणाऱ्या बालकाला दिला जातो. क्रीडा, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती, नाविण्यपूर्ण शोध.

पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व 1 लाख रोख रक्कम असे राहील. देशात 25 पुरस्कार दिले जातात. पुरस्कार दि.26 डिसेंबर रोजी घोषित केला जातो. त्याचे वितरण जानेवारी मध्ये केले जाते. पुरस्कारासाठी निवड राष्टीय निवडसमिती कडून करण्यात येते. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी सार्वजनिकरित्या खुले नामनिर्देशन हे केवळ (http://awards.gov.in)  या पोर्टलवर स्विकारले जाईल, पोर्टल व्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्विकारले जाणार नाहीत, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामनिर्देशने स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2025 रोजीपर्यंत आहे. भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली, यांच्या कार्यालयीन वेबसाईट (ww.wod.nic.in) वर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला, ए ब्लॉक कक्ष क्र. १०६, ओरोस सिंधुदुर्ग नगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग दुरध्वनी क्र. ९४०४४४४९ २२ व ९२०९०७ २७ ०९ येथे संपर्क करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैशाली काकडे यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026