LIVE UPDATES

भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा आज शुभारंभ

दीपक केसरकर यांची माहिती
Edited by: विनायक गावस
Published on: June 10, 2025 10:13 AM
views 621  views

सावंतवाडी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा आज संपन्न होणार आहे. मंत्रालय मुंबई येथून दिनांक १० जुन २०२५ वेळ दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री, आम.दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. 


यावेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री  इंद्रनील नाईक, पालकमंत्री नितेश राणे मंत्री, खासदार नारायण राणे यांची मुख्य  उपस्थिती राहणार आहे. तसेच आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच अतुल पाटणे प्रधान सचिव (पर्यटन), डॉ. बी.एन.पाटील (भा.प्र.से.) संचालक, पर्यटन संचालनालय, डॉ. माणिक दिवे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग, मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, अनिल पाटील (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मोहन दहिकर (भा.पो.से.) जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग  यांची उपस्थिती राहणार आहे‌. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संजय ढेकणे, क्षिप्रा बोरा, दिपक माने आदी अधिकारी वर्गान केल आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026