LIVE UPDATES

१४ जूनला शिवतीर्थावर येऊ नका; राज ठाकरे यांचे आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून हा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून मनसैनिक या दिवशी मुंबईतील शिवतीर्थावर येऊन त्यांना शुभेच्छा देतात.
Edited by:
Published on: June 11, 2025 20:49 PM
views 455  views


मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून हा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून मनसैनिक या दिवशी मुंबईतील शिवतीर्थावर येऊन त्यांना शुभेच्छा देतात. मात्र यंदा ही परंपरा खंडित होणार आहे. राज ठाकरे यांनी स्वतः पत्राद्वारे मनसैनिकांना यावर्षी शिवतीर्थावर न येण्याचं आवाहन केलं आहे.
या वर्षी १४ जून रोजी म्हणजेच वाढदिवसाच्या दिवशी ते सहकुटुंब मुंबईबाहेर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “मी वाढदिवस साजरा करणार नाहीये, किंवा काही विशेष कारण आहे असेही नाही. त्यामुळे कोणतेही वेगळे अर्थ काढू नयेत,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भावनिक पत्रात पुढे लिहिलं आहे की, “गेली अनेक वर्षं तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी भेटायला याल, हे निश्चित असतं. प्रत्येकाच्या भेटीचं, शुभेच्छांचं आणि प्रेमाचं मी ऋण मानतो. यंदा तुमचं दर्शन घडणार नाही, याची खंत राहील. पण मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा भेट निश्चित आहे.”
राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी आपल्या भागात लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्याचं आवाहन केलं आहे. “तुमच्या भागात सामाजिक उपक्रम राबवले, तर तेच माझ्या वाढदिवसाचं खऱ्या अर्थाने औचित्य ठरेल,” असं ते म्हणाले.
“तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करा. आपण लवकरच भेटू,” असा सकारात्मक संदेश देत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026