LIVE UPDATES

मुलींच्या शिक्षणासाठी ५ सरकारी स्कॉलरशीप

आई-वडिलांचा खर्चाचा भार होईल कमी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 11, 2025 21:25 PM
views 675  views

मुंबई : मुलींना उत्तम शिक्षण मिळावे. त्यांना स्वतः च्या पायावर उभं राहता यावे, यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. शिक्षणाचा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच मुलींच्या शिक्षणासाठी अनेक स्कॉलरशीप सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.

योजना अशा : 

- उडान स्कॉलरशीप 

सीबीएसई अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. जेणेकरुन त्यांना इंजिनियरिंगच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळेल. मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये ॲॅडमिशन घेता यावे. यासाठी मदत केली जाते. या स्कॉलरशीपमध्ये राखीव प्रवर्गातील मुलींना जागा राखीव असतात.

- बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप

बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशीप नववी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते. ही स्कॉलरशीप मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थिनींना मेरिट लिस्टद्वारे दिली जाते.

- प्रगती स्कॉलरशीप

प्रगती स्कॉलरशीप अशा मुलींना दिली जाते. त्यांनी AICTE मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये डिग्री किंवा डिप्लोमासाठी ॲॅडमिशन घेतले असेल. यासाठी मुलींच्या कुटु्ंबाचे उत्पन्न ८ लाखांचे कमी असावे.

- इंदिरा गांधी स्कॉलरशीप

इंदिरा गांधी स्कॉलरशीप फॉर सिंगल चाइल्ड ही त्या मुलींना दिली जाते ज्या एकुलत्या एक असतील. त्यांनी कोणत्याही नॉन प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये ॲॅडमिशन घेतले असेल.

- सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप

ही योजना खास महाराष्ट्रातील मुलींसाठी राबवण्यात आली आहे. मागासवर्गीय मुलींना ही स्कॉलरशीप दिली जाते. यामध्ये आठवी ते १० वीच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी ही स्कॉलरशीप सुरू करण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026