LIVE UPDATES

उपेक्षित लोककलावंतांना 'राजाश्रय' देणार : युवराज लखमराजे भोंसले

सावंतवाडीत 'लोककला महोत्सव'
Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2023 19:21 PM
views 564  views

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानकडून आजवर कलाकार व कलेला राजाश्रय देण्याच काम या आधीच्या राजा महाराजांनी केल. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज, श्रीमंत शिवरामराजे यांचा हा वारसा पुढे घेऊन जात आहेत ते युवराज लखमराजे सावंत-भोंसले. युवराजांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक राजवाड्यात गुरूवारी ५ जाने. ते रवीवार ८ जानेवारी या कालावधीत दशावतार लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कलाप्रेमींनी उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांनी केले आहे. दरम्यान, लोककलेतील उपेक्षित उपासकांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून शासन स्तरावरून लोककलावंतांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असणारच परंतू, राजघराण्याकडून देखील कलावंतांना राजाश्रय देणार असल्याच मत युवराज लखमराजेंनी व्यक्त केले.  


राजवाडा येथे होणाऱ्या या लोककला महोत्सवात जिल्ह्यातील सात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहेत. दररोज दोन नाट्यप्रयोग होणार असून ८ जानेवारीला समारोप होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता पहिला नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० वाजता दुसरा प्रयोग होणार आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लोककला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.५ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा 'गौरी स्वयंवर' हा नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा 'वेध राहुचे ग्रहण चंद्र सूर्याची' हा नाट्यप्रयोग होणार आहे. ६ रोजी सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा 'कर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य' हा नाट्यप्रयोग, त्यानंतर रात्री ८.३० ते १० या वेळेत खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली) यांचा पालीचा बल्लाळेश्वर' हा नाट्यप्रयोग होणार आहे.७ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत दत माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा 'शेषात्मज गणेश' नाट्यप्रयोग, रात्री ८.३० वाजता महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, सावंतवाडी यांचा 'प्रलंयकारी गणेश' नाट्यप्रयोग होणार आहे. हा ८ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा 'बहुवर्मा पुत्रप्राप्ती' हा नाट्यप्रयोग होणार आहे. त्यानंतर महोत्सवाचा समारोप होणार आहे. पारंपरिक दशावतार कला जिवंत ठेवण्यासाठी, तिचे जतन, कला वृद्धींगत करण्यासाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा, या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून लोककला महोत्सवाच आयोजन करण्यात आले आहे असं मत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. हिरामणी, डॉ. उत्तम देठे, डॉ. गणेश मर्गज, डॉ. बी.एन. हिरामणी, डॉ. डी.जी. बोर्डे, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026