LIVE UPDATES

‘श्रीं’च्‍या मूर्तीवर यंदा ‘छावा’ची छाप !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 12, 2025 20:27 PM
views 827  views

नांदेड : ऑगस्ट अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. पारंपरिक आकर्षणाच्या श्री मूर्तीबरोबरच गेले वर्षभर गाजलेल्या छाया या चित्रपटाचा प्रभाव मूर्ती निर्मितीवर झाला आहे. छावा स्टाईल मूर्ती चंदा बाजारात दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थांची पृष्ठभूमी या उत्सवाला असल्याने उत्साहाला पारावार नसेल. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात धूम अनुभवता येणार आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विघटित होत नाहीत. त्यामुळे जल प्रदूषण होते, असा आक्षेप घेत काही लोक न्यायालयात गेले होते. खरे म्हणने हा वाद २०११ पासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ३ महिन्यांपूर्वी न्यायालयाने प्लास्टरच्या मूर्तीबर चंदी घातली होती. याचाबत मूर्तिकारांच्या संघटनेने आवाज उठवला होता. स्थावर सुनावणी होऊन न्यायालयाने अगदी अलीकडे मूतीवरील बंदी उठवली आहे. परंतु आता वेळ कमी असल्याने पारंपरिक पद्धतीच्याच मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यातही मागणीच्या तुलनेत पुरवठा होऊ शकणार नसल्याने भाववाद अटळ असल्याचे सांगण्यात आले.

एरवी नैसर्गिक न्यायाने ५ ते १० टक्के

भाववाढ होणारच आहे. कारण मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव बाढले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरीस प्रतवारीनुसार ९ ते १२ हजार रुपये टन, रंग १५०० ते २० हजार रुपये प्रति २० लिटर, हजार ते १२०० रुपये मालामागे सरासरी १० टक्के भाववाढ झाली आहे. त्याचाही मूर्तीच्या दरावर परिणाम अपेक्षित आहे. शिवाय कामगारांची टंचाई आहे. ते सुद्धा मजुरी वाढवून मागत आहेत. कारखान्यासाठी जागा उपलब्ध नाही. विश्वकर्मा, मुद्रा यासारख्या योजना आहेत. परंतु त्यातून या व्यवसायाला वाश्रय मिळत नाही. लघु उद्योगासाठीही कर्ज मिळत नसल्याच्या मूर्तिकारांच्या तक्रारी आहेत.

नांदेड जिल्ह्यात मोठे कारखाने सुमारे २५० आहेत. तर तेवढीच संख्या घरगुती स्तरावर मृत्यां तयार करणाऱ्यांची आहे. नदिडमध्ये ७० टक्के मूर्ती या स्थानिक स्तरावर तयार केलेल्या विक्री होतात. तर ३० टक्के मूर्ती हैदराबाद, पेण, हमरापूर या भागातून येतात. नदिडमध्ये एक ते १५ फूट उंचीच्या श्री मूर्ती तयार केल्या जातात. यंदा मूर्ती किती उंच असावी, यावर अद्याप कोणतेही बंधन नाही. ठराविक मंडळांमध्ये उंच मूर्ती बसवण्यावाचत स्पर्धा असते. दरम्यान, या व्यवसायाला राजाश्रय मिळावा, अशी मागणी मूर्तिकारांची असून त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026