LIVE UPDATES

'सजना' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Edited by: ब्‍युरो
Published on: June 17, 2025 16:59 PM
views 342  views

मुंबई - प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड! "सजना" चित्रपटातून अशीच प्रेमकथा पाहायला मि‍ळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. म्हणजेच सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर एकत्रितपणे थेट प्रक्षेपित करण्यात आला. या ट्रेलर मध्ये सुंदर प्रेमाची सुरुवात, विचारसरणीतील अंतर, भावनिक संघर्ष, सुडाची भावना आणि प्रत्येक वळणावर धक्कादायक ट्विस्ट आपण पाहू शकतो.

शशिकांत धोत्रे आर्ट निर्मित आणि प्रस्तुत "सजना' सिनेमातील ह्या ट्रेलर मध्ये नायक आणि नायिकेच्या आयुष्यात येतात अनेक संघर्ष. मैत्रीचं प्रेमात रूपांतर, प्रेमाचं तुटणं आणि त्यातून उगम पावणारा सुड हे सगळं अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. प्रत्येक वळणावर गोष्ट बदलते, पात्रांचे रंग बदलतात आणि कथा एका अनपेक्षित शेवटाकडे प्रवास करते. शेवट अकल्पनीय आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की सर्व काही संपलं, तेव्हाच ही कथा घेते एक अनपेक्षित वळण, जे तुमचं मन सुन्न करतं. त्यामुळे एक विलक्षण सिनेमॅटिक अनुभव सिनेप्रेमींना ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.

'सजना' या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. छायाचित्रण रणजित माने यांनी केलं आहे. संगीत ओंकारस्वरूप यांचं असून रोमँटिक गाणी भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली बनले आहेत. "सजना" २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026