LIVE UPDATES

ओंकार भोजने स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर

Edited by: मनोज पवार
Published on: June 18, 2025 20:31 PM
views 2281  views

चिपळूण : "स्वच्छ भारत मिशन - शहरी" अंतर्गत चिपळूण नगर परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेत सामाजिक भान जपणाऱ्या आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडलेल्या अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छता दूत / ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नियुक्तीपत्र देताना सांगितले की, “चिपळूण शहरात स्वच्छता विषयक जनजागृती करण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींचा सहभाग अत्यावश्यक आहे. ओंकार भोजने हे युवकांचे प्रेरणास्थान असून त्यांच्या प्रतिमेमुळे स्वच्छता मोहिमेला नवी दिशा व ऊर्जा मिळेल.”

अभिनेते भोजने यांनीही या नियुक्तीचा स्वाभिमानाने स्वीकार करत सांगितले की, “स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चिपळूणकरांसोबत हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी मी पूर्ण योगदान देईन.”

शहरात लवकरच स्वच्छतेसाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून त्यात ओंकार भोजने सक्रिय सहभाग घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे मोहिमेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026