LIVE UPDATES

आता पंढरीच्‍या वारीतही ‘एआय दिंडी’चा गजर

Edited by: ब्‍युरो
Published on: June 19, 2025 16:00 PM
views 687  views

कोल्‍हापूर : आता पंढरीच्या वारीतही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय दिंडी पाहायला मिळणार आहे. यात विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायांतील लोकांना सामावून घेणारी ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी, कृत्रिम  बुद्धिमत्तेचा वापर, आध्यात्मिक इंटेलिजन्स आणि एआय म्हणजे मराठीत आई अर्थात माउली अशा एआयच्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. परंपरेची ओळख सांगणारी व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचे आकर्षण ठरणार आहे.

अनेकांना वाटते की, फक्त आयटी क्षेत्रातीलच लोक या दिंडीत सहभागी होऊ शकतात का ? घरातील अन्य व्यक्ती चालतील का ? मी गृहिणी आहे अथवा निवृत्त आहे, मला सहभागी होता येईल का ? इ. यासाठी अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून त्यांना संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे या उद्देशाने वारीच्या पुणे ते पंढरपूर या टप्प्यांसाठी 'एआय दिंडी' या नावाने सेवा द्यायचे या टीमने ठरवले आहे.

एआय दिंडी काय करते ? जाणून घ्या. लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल, अशी व्यवस्था आयोजकांनी विकसित केली आहे. ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी पुण्याहून बसची व्यवस्था केली आहे. तसेच पुन्हा पुण्यात सोडण्याचीही व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, पावले खेळता यावीत यासाठी एआय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे भजनसंध्या आणि वारीतील खेळ आयोजित करते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026