LIVE UPDATES

आजरा तालुका गोवा राज्यात समाविष्ट करण्याची मागणी

पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या नावे असणारे निवेदन तहसीलदारांना सादर
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 19, 2025 19:39 PM
views 886  views

आजरा :  आजरा तालुक्यातील विकासाच्या अभावामुळे आणि सातत्याने होणाऱ्या राजकीय व प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील विविध सामाजिक व व्यवसायिक संघटनांनी तालुका गोवा राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. यासाठी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याच्या नावे निवेदन आजरा तहसीलदारांना सादर करण्यात आले.

या निवेदनात आजरा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदारसंघांपैकी एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती मतदारसंघ कमी करून तालुक्यावरील अन्याय वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या ६०-७० वर्षांत तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही. चार मोठी धरणे झाली तरी पुनर्वसनासाठी तालुक्यातीलच जमिनी वापरण्यात आल्या, गडहिंग्लज व कर्नाटकातील जागा रिकाम्या राहिल्या.

आजरा तालुक्याच्या भौगोलिक रचनेची गोवा राज्याशी साम्य असून, येथील निसर्गसंपन्नता व काजू, शेतीमाल, पोल्ट्री यांसारख्या उद्योगांना गोव्यातील बाजारपेठ व प्रक्रिया सुविधा मिळाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या तालुक्याच्या शेतीमालासाठी हक्काची बाजारपेठ नाही, पण गोवा राज्यातील बंदर व प्रक्रिया उद्योगांच्या साहाय्याने या उत्पादनांचा दर्जेदार वापर आणि निर्यात शक्य होईल.

मुंबई राजधानी पासून साडेचारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या आजरा तालुक्याला प्रशासकीय संपर्कासाठी अधिक जवळची राजधानी असलेल्या गोव्याशी जोडले जाणे आवश्यक असल्याचा युक्तिवादही संघटनांनी केला आहे. या निवेदनावर आजरा तालुका काजू प्रक्रिया संघटना (प्रकाश कोंडुस्कर), स्वाभिमानी शेतकरी संघटना (तानाजी देसाई), श्रमिक मुक्ती दल (संजय तरडेकर), महाराष्ट्र धरणग्रस्त संघटना (शिवाजीराव गुरव), आजरा तालुका पोल्ट्री व्यवसायिक संघटना (राजू होलम), सरपंच संघटना (जी. एम. पाटील) आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026