LIVE UPDATES

चला गणपतीक गावाक जावची तयारी करा...

२३ जूनपासून करता येणार आरक्षण
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 20, 2025 14:35 PM
views 1136  views

२५० हून अधिक जादा गाड्या सोडणार 

सिंधुदुर्ग : कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे बुकींग साधारण २३ जूनपासून सुरु होत आहे. यंदा गणेशोत्सव बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. त्यामुळे कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी ६० दिवस आधी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पहाता साधारण २३ जूनपासुन सुरु करावे लागणार आहे. तरीही गणेश चतुर्थीच्या आधी २ दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने २५ आणि २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असणार आहे.

गेल्यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी झाले होते. यावर्षी १२ दिवस अगोदर म्हणजे बुधवार दि. २७ ऑगस्ट रोजी गणपत‌ी बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे ६० दिवसआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा चार्ट खालीलप्रमाणे असणार आहे.

२५०हून अधिक गणपती स्पेशल रेल्वे

कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असते. या गाड्यांचे आरक्षण सुरु होताच फुल होत असते. इतकी प्रवाशांची गर्दी कोकणात गणपतीत जाण्यासाठी असते. त्यामुळे मध्य रेल्वे कोकण मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडत असते. या गाड्यांना देखील गर्दी होत असते. मुंबई गोवा मार्गाची अवस्था बिकट असल्याने यंदाही चाकरमान्यांना रेल्वेचा प्रवास बरा पडणार आहे.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026