चिपळूण : शिवसेना उपशहर प्रमुख कपिल शिर्के यांच्या पुढाकाराने आणि योगिता दंत महाविद्यालय, खेड यांच्या सहकार्याने चिपळूण शहरातील प्रभात रोड येथे नुकतेच भव्य दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
शिबिराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, उपशहर प्रमुख कपिल शिर्के, राणी महाडिक, भाजपचे शशिकांत मोदी, राम शिंदे, परिमल भोसले, विनोद कदम, संदीप भिसे, महेश कांबळी, प्रभात रोड फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश काटकर, उपाध्यक्ष सुमती जांभेकर, सेक्रेटरी संतोष इनामदार, सहसेक्रेटरी धनश्री जोशी, विश्वस्त शर्मिला मोरे, प्रमोद लाड, बाळशेठ परांजपे, प्रकाश देशमुख, शुभांगी काणे, राजेश पल्लोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हाप्रमुख रश्मीताई गोखले, शहरप्रमुख प्राजक्ताताई टाकले, उपशहर प्रमुख राणी महाडिक, शहर सचिव सुकन्या चव्हाण, विभागप्रमुख तृप्ती कदम, शिवसेना कार्यकर्त्या प्रिया शिंदे यांचाही सहभाग होता.
शिबिरामध्ये योगिता दंत महाविद्यालय खेड येथील डॉ. इंद्रजीत देशमुख, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी व इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत दंत तपासणी व मार्गदर्शन केले. रॉयल नगर व प्रभात रोड फाउंडेशन यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. दंत आरोग्य जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिरामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ताजी बातमी
View all








