LIVE UPDATES

सिंधुदुर्गात पासपोर्ट ऑफिस होणार ?

आ. निलेश राणेंची थेट परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडे मागणी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2025 15:14 PM
views 861  views

मालवण : सिंधुदुर्गवासियांना पासपोर्टच्या कामासाठी कोल्हापूर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात जावे लागते, जे सुमारे १५० ते १८० किलोमीटर अंतरावर आहे. या लांबपल्ल्याच्या प्रवासामुळे वेळ आणि पैशाचे मोठे नुकसान होते, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे, अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) ची तातडीची गरज आहे. सध्या, सिंधुदुर्गमधील रहिवाशांना कोल्हापूर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात जावे लागते, जे सुमारे १५० ते १८० किलोमीटर अंतरावर आहे. या लांबपल्ल्याच्या प्रवासामुळे वेळ आणि पैशाचे मोठे नुकसान होते, विशेषतः ग्रामीण भागातील लोक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग हे त्रासदायक ठरत आहे. सिंधुदुर्ग हा एक सीमावर्ती जिल्हा आहे आणि एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. या जिल्ह्यातील पासपोर्ट अर्जदारांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत आहे. जवळील पासपोर्ट सेवा केंद्र नसल्यामुळे जनतेला विलंब आणि त्रास सहन करावा लागतो.

ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील रहिवाशांना सोयीस्कर आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र किंवा POPSK स्थापन करण्याचा विचार करावा. याबाबत आपण लवकरात लवकर या योग्य ती पावले उचलाल, अशी अपेक्षा आ. निलेश राणे यांनी व्यक्त केली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026