LIVE UPDATES

'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 28, 2025 11:53 AM
views 544  views

शेफाली जरीवाला हिचे अचानक निधन झाले. या घटनेने बाॅलीवूडमध्ये खळबळ उडाली असून तिच्या अचानक एक्झिटमुळे सर्वांना धक्का बसला आहे. तीनच दिवसांपुर्वी ती तंदुरुस्त होती, अचानक तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

२००० च्या दशकातील पाॅप कल्चर ऑयकाॅन शेफाली जरीवाला ही होती. कांटा लगा या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. प्राप्त माहितीनुसार, शेफाली जरीवाल हिला शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटका आला. यानंतर तिला लगेचच मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला तिचे पती आणि टीव्ही अभिनेता पराग त्यागी आणि इतरांनी दाखल केले. तथापि, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

मिंटच्या अहवालानुसार, रुग्णालयाचे डॉक्टर विजय लुल्ला यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला, तर दुसरे डॉक्टर डॉ. सुशांत यांनी मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. शेफाली जरीवालाला 'कांटा' लगा' मधून प्रचंड ओळख मिळाली.

'कांटा लगा'मुळे रातोरात स्टार- 2002 मध्ये आलेल्या 'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओमुळे शेफाली रातोरात प्रसिद्ध झाली. त्या काळात हे गाणे युट्यूब नसतानाही फारच लोकप्रिय बनले होते. शेफालीने तिच्या बोल्ड स्टाईल आणि डान्सिंग स्टाईलमुळे एक खास स्थान निर्माण केले होते. ती पुन्हा 'बिग बॉस १३' मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक वर्षांनंतर, ती 'बिग बॉस १३' मध्ये दिसली.

'तीन दिवसांपूर्वीपर्यंत ठिकठाक होती शेफाली- शेफाली जारीवाला तीन दिवसांपूर्वीपर्यंत ठिकठाक होती. तिच्या अचानक एक्झिटने बाॅलीवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तर तिचे चाहतेही हळहळले. शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबतचे संसारातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर व्यक्त करायची. चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडली. त्यांची केमिस्ट्री सकारात्मक कपल गोल म्हणून पाहिली जात होती.

प्राप्त माहितीनुसार, तिला हृदयविकाराचा झटका आला आणि हेच कार्डियाक अरेस्ट तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. तिच्या मृत्यूनंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. आता तिच्या मृत्यूच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026