LIVE UPDATES

Dasara Melava 2022 | शिंदे गटातील मद्यधुंद समर्थकांना ठाकरे गटातील महिलांचा चोप !

नाशिक-मुंबई महामार्गावरील खर्डी इथला प्रकार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 05, 2022 18:13 PM
views 601  views

नाशिक : मुंबईतील दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना नाशिक-मुंबई महामार्गावरील खर्डी येथे ठाकरे गटातील महिलांनी वाहन थांबवून चोप दिला. मद्यधुंद अवस्थेत संबंधितांकडून हातवारे केले जात होते. त्यामुळे महिलांनी त्यांची जीप रोखली आणि चोप दिल्याचे शिवसेनेच्या शहर समन्वयक श्रध्दा दुसाने यांनी सांगितले.शहरातील sशिवसेना (ठाकरे) गटातील महिला दुपारी बसमधून मुंबईतील मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. कसारा घाट ओलांडल्यानंतर बस पुढे गेली.

यावेळी महामार्गावरून शिंदे गटाची जीप बससोबत समांतरपणे जात असताना जीपमधील शिंदे गटाच्या समर्थकांनी बसमधील महिलांकडे पाहून विचित्र हातवारे केले. शिवीगाळ केली. खिडकीत बसलेल्या महिलांना ही बाब लक्षात आली. त्यांनी बस चालकाच्या मदतीने खर्डी येथे संबंधितांची जीप रोखली. या जीपवर शिंदे गट मेळाव्याचे पत्रक चिकटविलेले होते. संतप्त महिलांनी जीपमधील चार ते पाच जणांना चोप दिला. ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते, असे दुसाने यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात मेळाव्यास निघालेले शिवसैनिकही महिलांच्या मदतीला धाऊन आले. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे दुसाने यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026