LIVE UPDATES

तू म्हणशील तिथे येतो, आताच संरक्षण सोडतो, बघुया काय करतो ते !

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी संजय राऊतांच चॅलेंज स्वीकारलं !
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 07, 2023 13:00 PM
views 1428  views

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जळजळीत शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय या भेटून संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. संजय राऊत यांचा उद्देश चांगला नाही. मातोश्रीबद्दल संजय राऊतांची भूमिका योग्य नाही, असं राणे यांचं म्हणणं आहे.

उद्धव ठाकरेंना भेटून असं काही मी गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे संजय राऊत चपलेने मार खाणार, असं नारायण राणे म्हणालेत.

“एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा…”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.


भाजप आमदार राम कदम यांच्याकडून काशी यात्रेकरुंसाठी खास सोय करण्यात आली. ही यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. त्याला नारायण राणे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना राणे यांनी राऊतांवर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत मातोश्रीला संपवणारी व्यक्ती आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा विष आहे. तो ज्याच्या अंगावर हात टाकेल तो खांदा गळालाच समजा, असं राणे म्हणालेत.

संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटं फिरण्याचं आव्हान दिलं होतं. ते चॅलेंज राणेंनी स्विकारलं आहे. “तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते!”, असं प्रति आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026