LIVE UPDATES

शक्तीपीठाचा प्लॅन 101 टक्के बदलणार : मंत्री नितेश राणे

गोव्याकडे न जाता सुचवले हे दोन पर्याय
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 03, 2025 13:48 PM
views 1097  views

सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग संदर्भात येथील लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकवण्याच काम सुरू आहे.हे मी कदापी खपून घेणार नाही, असे सांगतानाच शक्तिपीठ महामार्ग होताना जो यामध्ये बाधित होईल अशा प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. आत्ता असलेला जो शक्तिपीठ महामार्गाचा प्लॅन आहे तो आपल्यासाठी उपयोगाचा नाही हा प्लॅन 101% आम्ही बदलणारच शक्तिपीठ मार्ग लोकांच्या हितासाठी आहे. तो मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईंट किंवा मळगांवकडे जाईल असे पाहणार आहे.असे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकाराची संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शक्तिपीठ संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे. तसेच कालच मी एमएसआरटीसी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत ल.त्यांच्याशी ही माझी चर्चा झाली. सर्वात प्रथम सिंधुदुर्गच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका  राज्य सरकारची सांगेन की, प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच  हा महामार्ग होणार आहे.  आम्ही मी असो खासदार राणे साहेब आणि जिल्हाधिकारी असे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एमएसआरडीसी आणि अन्य लोकांना  सांगितले की, लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरा म्हणजे आम्हाला पर्यायी दोन-तीन मार्ग दाखवा कारण का आता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे. त्याच्यामध्ये आमचं बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आणि म्हणून आम्ही सांगितलं की या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत. हा महामार्ग जर गोव्यात निघत असेल तर त्याचा महाराष्ट्राला काय फायदा, सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणारच आहे. त्यासंबंधी कॅबिनेट मध्ये  पण आमची चर्चा झाली.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे पर्याय आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा मळगाव या काही भागांमध्ये तो शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे  हलवण्याची गरज वाटणार नाही.  काही लोकांच्या जे काही शेती मधून अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल. पण आत्ता जो करंट प्लान आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणार आहोत.  तो आताचा प्लॅन राहणार नाही केसरकर साहेबांनी पण कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रक दिलेला आहे.  आमची जी काही भूमिका आहे आमच्या सगळ्यांची एकत्र भूमिका आणि म्हणूनच जे जे कोण विरोध करण्याचा जे काही नौटंकी सुरू आहे. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांनी आम्हाला आठ नऊ महिने अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे. आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे.

     लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे. ज्यांना लोकांनी नाकारलेला आहे. ज्यांना लोकांनी घरी बसवलेला आहे. त्यांनी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये. तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून. आम्हाला काय उगाच तिथे वातावरण खराब करायचं नाही.  उगाच  कुठलाही पोलीस बाळाचा वापर करायचा नाही. ते आंदोलन करत आहेत जे काही त्यांची शिष्टमंडळ आहेत. जी काय कुठली तरी समिती केली असेल तर समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलाव, त्यांच्या काही प्रश्नांची उत्तर द्यायचं असेल तर मी तयार आहे आणि  आमची भूमिका पारदर्शक आहे आम्हाला काही लपवालापी करायचे नाही. हा नॅशनल हायवे  तयार केला आहे. तसेच हा शक्तिपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठी केला जाईल आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे  न जाता आता मळगाव किंवा झिरो पॉईंट असा आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून याबाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे, असे स्पष्ट मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026