LIVE UPDATES

राज - उद्धव ठाकरे 20 वर्षांनी एकत्र ; कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर ; गेट तोडून प्रवेश
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 05, 2025 11:59 AM
views 819  views

मुंबई : संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. मात्र कार्यकर्त्यांची अविश्वसनीय गर्दी पाहायला मिळाली.  

मुंबईतील वरळी डोममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरळीत दाखल झाले आहेत. तसेच विविध मराठीप्रेमी देखील एनएससीआय डोममध्ये पोहचले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांआधी विविध राजकीय पक्षासोबत विविध साहित्यिक, कलाकार, शाळेतील शिक्षक, विविध मंडळे यांना मराठीसाठी सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. तसेच कोण कोण येत नाही, हेही बघतोच, असं विधानही राज ठाकरेंनी केलं होतं.  त्यानंतर आज विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची हजेरी पाहायला मिळत आहे.  

मात्र, सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी आता पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेलीय. अनेक कार्यकर्त्यांनी गेट तोडून प्रवेश केलाय.  


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026