LIVE UPDATES

सावित्री पुल धोकादायक | मध्यभागी पुलाला जोडणारा लोखंडी चॅनेल तुटला

लवकरच होणार दुरुस्ती
Edited by: नितेश लोखंडे
Published on: January 10, 2023 15:48 PM
views 691  views

महाड : 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. आजही ही घटना आणि त्यानंतरचे शोध कार्य अंगावर रोमांच उभे करते. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा यासह 40 जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले होते, त्यावेळेस फडणवीस सरकारने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता 165 दिवसांमध्ये नवीन पुल उभे केले, परंतु संबंधित खात्याने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने आज पुल धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


सावित्री पुलावरील मध्य भागात लोखंडी चॅनलचे तुकडे झालेले असल्याने या  पुलावरून वाहतुक करते वेळेस व्हायब्रेशन होत असल्याने तिथे उभे राहिले असता झुलत्या पुलावर उभे राहिल्यासारखे वाटत आहे, पुलाला दोन्ही बाजूला जोडणारा लोखंडी चॅनेल तुटल्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित खात्याने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रवाशांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026