LIVE UPDATES

आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण तक्ता

Edited by:
Published on: July 12, 2025 19:16 PM
views 697  views

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण तक्ताच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. रेल्वेचे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे नाव, कोच क्रमांक आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण तक्ता तयार केले जातात. स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी ही यादी प्रसिद्ध केली जाते. पण आता हा तक्ता आठ तास आधी जारी केला जाईल. १४ जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाईल, पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या अर्धा तास आधीच अंतिम आरक्षण तक्ता  तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.

सुधारित वेळापत्रकानुसार, सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता आता आदल्या दिवशीच्या रात्री ९:०० वाजता तयार केला जाईल. दुपारी २:०१ ते ४:००  या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता त्या दिवशी सकाळी ७:३० वाजता तयार होईल. सायंकाळी ४:०१ ते रात्री ११:५९ आणि मध्यरात्री ००:०० ते सकाळी ०५:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता नियोजित प्रस्थान वेळेच्या आठ तास आधी तयार जाहीर केला जाईल.

रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरक्षण चार्टच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधीच अंतिम आरक्षण तक्ता तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील. हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026