कणकवली : शेत मांगरात विनापरवाना बंदुकीसह जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने पांडुरंग उर्फ संतोष आत्माराम घाडी (४६, रा. मूळ रा. तेलीवाडी, वरवडे, सध्या रा. वरवडे, निरभाटले ता. कणकवली) याला ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवार सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास केली. पोलिसांनी बंदुकीसह जिवंत काडतुसे जप्त केली. त्याची किमत ३५ हजार ४०० रुपये आहेत. याप्रकरणी त्याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीच्या पथक कणकवली तालुक्यात पेट्रोलिंग करीत असताना वरवडे येथे एका व्यक्तीने आपल्या घरात विनापरवाना बंदूक ठेवण्याची माहिती मिळली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने त्या व्यक्ती घर गाठले. त्याच्याजवळ पोलिसांनी चौकशी केली असता त्याने शेत मांगारत बंदूक लपविल्याचे सांगितले. शेत मांगरातून पोलिसांनी लपवलेल्या बंदुकीसह ५ जिवंत काडसुते जप्त केली. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, सुरेश राठोड, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, रुपाली खानोलकर, किरण देसाई यांच्या पथकाने केली. याप्रकरणी किरण देसाई यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पांडुरंग उर्फ संतोष घाडी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी
View all








