LIVE UPDATES

'चला करूया गणपती' कार्यशाळा

नाव नोंदणीसाठी २२ जुलै अंतिम मुदत
Edited by: मनोज पवार
Published on: July 19, 2025 11:20 AM
views 840  views

चिपळूण : संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने ‘चला करूया गणपती’ ही मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची एकदिवसीय कार्यशाळा रविवार, २७ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये मुलांना भारतीय संस्कृतीची जाणीव करून देत कलात्मकतेचा विकास घडवण्याचा उद्देश असून, यासाठी प्रशिक्षक म्हणून संतोष केतकर आणि सुनील खेडेकर मार्गदर्शन करणार आहेत.

ही कार्यशाळा २७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता रा.स्व. संघाच्या माधव बाग, बेंदरकर आळी, चिपळूण येथे सुरू होणार असून सायंकाळी ५ पर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. इयत्ता पाचवीपासून पुढील वयोगटातील कोणीही यात सहभागी होऊ शकतो. मात्र कार्यशाळेच्या व्यवस्थापनासाठी २२ जुलैपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून प्रवेशासाठी रु.१५०/- शुल्क रोख स्वरूपात प्रशिक्षणाच्या दिवशी भरायचे आहे.

प्रशिक्षणासाठी लागणारी माती आयोजकांकडून पुरवण्यात येणार असली तरी ५ इंच बाय अर्धा इंच आकाराचे लाकडी कोरणे (एक बाजू सरळ व दुसरी बाजू तिरकी), १ फूट बाय १ फूट आकाराचा जाड पुठ्ठा किंवा प्लायवूड, हात पुसायला कपडा, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली प्रशिक्षणार्थींनी स्वतः आणावी लागेल.

या कार्यशाळेनंतर ३ ऑगस्ट रोजी रंगकाम प्रशिक्षण घेण्यात येणार असून त्या दिवशी पोस्टर रंग, रंग करण्यासाठी डिश, पाण्यासाठी भांडे आणि १ व ८ क्रमांकाचे ब्रश प्रशिक्षणार्थींनी बरोबर आणावे. रंगकामानंतर प्रत्येकजण आपली मूर्ती घरी घेऊन जाईल. मूर्ती न नेणाऱ्यांची मूर्ती आयोजकांकडून विसर्जित करण्यात येईल.

या उपक्रमासाठी अधिक माहितीसाठी संतोष केतकर (९८५०८८८२७४) आणि मंगेश बापट (९४२२००३४२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे नेतृत्व संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शरद तांबे व महामंत्री मंगेश बापट करत आहेत.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026