LIVE UPDATES

नव्‍या राजकारणाचा ‘उदय!’

तब्‍बल एकाच पक्षातले २० जिल्‍हाध्‍यक्ष प्रवेश करणार शिवसेनेत
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 24, 2025 19:55 PM
views 1652  views

 मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार 

रत्‍नागिरी : स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील. शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा रत्‍नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पक्षातील आपले वजन सिद्ध केले आहे. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रा. जालिंदर पाटील यांनी २० जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली. त्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उदय सामंत म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या मुख्य प्रवाहात आणता येतील. तसेच, विकासाच्या कामातही मदत होईल." उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय निश्चित झाला. लवकरच हे २० जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026