LIVE UPDATES

बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'दहाड'चा प्रीमिअर

रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांचं दिग्दर्शन
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 16, 2023 18:15 PM
views 602  views

मुंबई : एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि टायगर बेबीद्वारा निर्मित तसेच रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय द्वारा दिग्दर्शित 'दहाड'ही सिरीज बर्लिनले येथे प्रीमियर होणारी पहिली भारतीय सिरीज आहे. तसेच, या सिरीजला बर्लिनले सिरीज कॉम्पिटिशनमध्ये इतरांसोबत स्पर्धा करताना पाहायला मिळेल.


एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटची 'दहाड' ही सिरीज राजस्थानमधील एका छोट्याशा शहरात स्थित आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमधील सब-इंस्पेक्टर अंजली भाटी आणि त्यांच्या सहकार्‍यांना फॉलो करणारी ही 8 भागांची स्लो बर्न क्राईम ड्रामा सिरीज आहे. जेव्हा अनेक महिला पब्लिक बाथरूममध्ये  मृतावस्थेत आढळतात तेव्हा सब-इंस्पेक्टर अंजली भाटी यांना तपासासाठी नियुक्त केले जाते. सुरुवातीला मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे वाटते, परंतु प्रकरण जसजसे उघडकीस येते तसे अंजलीला असा संशय येऊ लागतो की या हत्यांमागचा सिरियल किलर मोकळे फिरत आहे. त्यानंतर अंजली दुसर्‍या निष्पाप महिलेचा जीव वाचवण्यासाठी पुरावे एकत्र करते आणि एक अनुभवी गुन्हेगार आणि दलित पोलिस यांच्यातील मांजर आणि उंदराचा मनोरंजक खेळ सुरू होतो. 


'दहाड'च्या आधी, रीमा कागतीने 'तलाश', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'गली बॉय' (बर्लिनले येथे सादर झालेले) यासारख्या चित्रपटांसह क्रिटिकली अकलेम्ड आणि आवडत्या कथा दिल्या आहेत. तसेच, 'मेड इन हेवन' सारखी उत्कृष्ट वेब सिरीजही त्यांनी दिली आहे. अशातच, रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉयद्वारा दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, झोया अख्तर, रीमा कागती आणि फरहान अख्तरद्वारा निर्मित 'दहाड'ही वेब सिरीज २०२३ मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026