वेंगुर्ला : दिनांक ४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला व सावंतवाडी येथे एकाच दिवशी पोलीस असल्याचे बतावणी करून वृद्धांना लुटणाऱ्या टोळीतील अजून एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या टीमने गजाआड केले आहे.
उनमत युसुफ इराणी (३२) रा-सांगली रेल्वे स्टेशन जवळ,इराणी वस्ती, सांगली याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी सांगली रेल्वेस्टेशन जवळ शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता वेंगुर्ला पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच अबू तालीम मुसा इराणी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाने सांगली येथून अटक केलेली होती. तर आज १७ ऑगस्ट रोजी दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस व पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेली आहे.
ताजी बातमी
View all








