देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील पोस्ट ऑफिसमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने मागील दराने पोस्ट ऑफिस मध्ये प्रवेश करत तळेबाजार पोस्ट ऑफिसच्या कार्यालयीन कामकाजाचे दोन मोबाईल चोरून नेले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवार ३ सप्टेंबर ते गुरुवार ४ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी ५ ते सकाळी ८ या कालखंडात घडली असून यावेळी ३ रोजी सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजले नंतर पोस्ट ऑफिस बंद करून गुरुवारी ४ सप्टेंबर सकाळी ८ वाजता पोस्ट ऑफिस उघडले असता पोस्ट ऑफिसचे मागील दार उघडे असल्याचे आढळून आले . त्यावेळी, पहाणी केली असता पोस्ट ऑफिसच्या कार्यालयीन कामकाजाचे दोन मोबाईल चोरीस गेल्याचे डाक सहाय्यक यांच्या निदर्शनास आले. यात सॅमसंग व रियल मी कंपनीचे प्रत्येकी एक मोबाईल याप्रमाणे दोन मोबाईल सुमारे ६ हजार किमतीचे अज्ञात चोट्याने लंपास केल्याचे फिर्याद पोस्ट ऑफिसचे प्रभारी डाक सहाय्यक आशिष संदिपान कुसभागे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून बीएनएस ३०५, ३२१(३)३२१(४ नुसार अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all








